उद्योजक चर्चा

मराठी उद्योजकांच्या संघटन आणि एकात्मिक विकासाची चळवळ

आमची मूल्ये

नेटवर्क

"तुमचे नेटवर्क हि तुमची नेटवर्थ आहे" खरतर हे शक्तिशाली साधन आहे जे तुमचे करिअर घडवू शकते आणि आजच्या एकमेकांशी जोडलेल्या जगात व्यवसायाचे मजबूत नेटवर्क राखणे पूर्वीपेक्षा अधिक महत्वाचे झाले आहे.

संधी

उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी आपण बाजारात संधींच्या शोधत असतो. आमची संस्था विद्यमान आणि प्रस्तावित उद्योजकांना व्यवसायाच्या संधी उद्योजकांच्याच माध्यमातून उद्योजक आणि सर्वसामान्य मराठी माणसापर्यंत पोहचवण्यासाठीचा एकच मंच उपलब्ध करून देते ज्यावर संधींची देवाणघेवाण होते.

मार्गदर्शन

संस्थेच्या माध्यमातून अनेक तज्ञ उद्योजकांकडून आपल्या व्यवसायासाठी उत्तम मार्गदर्शन त्यांनी घेतलेल्या अनुभवातून आणि शिक्षणातुन व्यवसायिकांना देण्याचा उपक्रम

व्यक्तिमत्व विकास

उद्योग व्यवसायाच्या विकासाबरोबरच उद्योजकाच्या स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावरसुद्धा काम करण्याच्या संस्थेचा माणस आहे. त्यासाठी आमच्यासोबत अनेक तज्ञ प्रशिक्षक जोडले गेलेले आहेत.

सामाजिक कार्य

उद्योग व्यवसायाच्या मुख्य प्रवाहातुन संपुष्टात येत असलेला मराठी समाज एकाच मंचावर एकत्र आणुन उद्योग व्यवसाया संदर्भातील जागरूकता निर्माण करणे आणि उद्योग व्यवसायात येणाऱ्या अडचणींवर सातत्याने निरसन करणे

विचारांची देवाणघेवाण

चांगल्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आपल्या समाजातील लोक एकत्र येण्यावाचून पर्याय नाही हा असा मंच आहे जेथे चांगल्या विचारांना चालना देऊन उद्योग व्यवसायाच्या संकल्पणा सत्त्यात उतरवून त्या यशस्वी करण्यावर काम होते.

मराठी उद्योजकांनी मराठी उद्योजकांसाठी उभारलेली मराठी उद्योजकांची एकमेव संघटना

आमची उद्दिष्ट्ये

मराठी समाजातील असंघटित उद्योजक व्यवसायिकांना एकत्र आणणे, बहुतांश मराठी तरुणांना व्यवसायाकडे वळवणे, मराठी उद्योजक वाढवणे, टिकवणे आणि टिकलेल्या उद्योजकांना अनुकूल वातावरण निमार्ण करून देणे.

आमचे ध्येय

महाराष्ट्रात किंबहुणा देशात आणि जगात मराठी उद्योजक वाढवून उद्योग व्यवसायापासून अलिप्त राहणाऱ्या मराठी समाजाला उद्योग जगतामध्ये मुख्य प्रवाहात आणून मराठी समाजाला आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक सक्षम करणे .

सदस्य
0 +
ऑनलाइन कार्यक्रम
0 +
ऑफलाइन कार्यक्रम
0 +
शाखा
0 +

व्यवसाय प्रशिक्षण

मराठी उद्योजक क्लब

ऐक्य l संधी l प्रगती l प्रोत्साहन l सक्षमता

सकाळची शाळा ​

प्रगतशील मराठी उद्योजक घडविण्याची संकल्पना

उद्योजक महाराष्ट्राचा

उद्योग व्यवसायातील महाराष्ट्र उद्याचा.​

तमाम मराठी जनतेस,

      महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. उद्योग आणि व्यवसाय हा या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंतु महाराष्ट्रात उद्योगव्यवसायाच्या सर्वोच्च स्तरावर परप्रांतातून येऊन इतर समाजांनी मक्तेदारी स्थापन केलेली आहे आणि आपला मराठी समाज याच उद्योगव्यवसायांच्या दारोदारी रोजगार मागत फिरताना दिसतोय. मराठी समाजाने पिढ्यानपिढ्या उद्योग व्यवसायाकडे पाठ फिरवलेली आहे आणि याचे पडसाद खोलवर उमटल्यावर आपण जागे होत आहोत. खूप कमी प्रमाणात  असलेला उद्योग व्यवसायातील मराठी समाज आपल्याला वाढवायचा आहे.

      अजूनही वेळ गेलेली नाही, सुरवात आपण आपल्या मूलाबाळांपासून करू, त्यांना उद्योग व्यवसायाचे बाळकडू शैक्षणिक जीवनातच देण्याचा प्रयत्न करू, त्यामुळे ते शिक्षण संपल्यावर नोकऱ्या शोधत बसणार नाहीत तर प्रत्येक मराठी तरुण व्यवसायाकडे वळेल आणि महाराष्ट्रात  उद्योगव्यवसायात आपली मक्तेदारी प्रस्थापित करू शकेल यात शंका नाही.

           चला तर मग मराठी तरुण उद्योगव्यवसायात आणून, वाढवून तो टिकविण्याच्या या चळवळीत सामील होऊया.

अनिल पाटील

संस्थापक उद्योजक चर्चा

अभिप्राय

परमेश्वरजी कदम
ज्योतिराम सपकाळ
विनोद मेस्त्री