सकाळची शाळा

Udyojak Churcha

सकाळची शाळा

266 266 people viewed this event.

     शाळेमुळेच स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते. शाळेमुळेच सर्वांगिण म्हणजेच बौद्धिक ,सामाजिक,मानसिक , शारीरिक व नैतिक विकास होतो.म्हणूनच हे शालेय वातावरण कायमस्वरूपी टिकवून आपल्या उद्योग व्यवसायात सुद्धा आपला सर्वांगिण विकास अविरत पणे चालू ठेवण्यासाठी आम्ही मराठी उद्योजकांची सकाळची शाळा हा उपक्रम राबवत आहोत.
       तज्ज्ञांच्या सल्याप्रमाणे सकाळी लवकर उठल्याने जीवनातील समस्यांना चांगल्या प्रकारे तोंड देता येते.तज्ञ म्हणतात सकाळी आपली इच्छा शक्ती प्रबळ असते,त्याच्या सहाय्याने आपण कितीतरी संकटांशी सामना करू शकतो.म्हणून यशस्वी लोक सकाळच्या वेळेचा उपयोग विचार पूर्वक करतात.याच संकल्पनेने प्रेरीत होवून आपली संस्था उद्योजक चर्चा मराठी उद्योजक व्यावसायिकांची सकाळची शाळा हा अनोखा उपक्रम घेवून येत आहे.
    या उपक्रमात विद्यमान आणि प्रस्तावित उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाच्या संकल्पनेपासून ते उभारणी करून यशस्वी करण्यापर्यंतचे धडे तज्ञ गुरुजनांच्या माध्यमातून देण्याचा संस्थेचा मानस आहे.या उपक्रमात सहभागी होवून मराठी उद्योजक आपल्या व्यवसायात वृद्धी करू शकतात, नाविन्यपूर्ण संकल्पना अंमलात आणू शकतात.यशस्वी मराठी उद्योजक घडविणे हे या संस्थेचे उद्दिष्ट्ये आहे आणि ते साध्य करणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.

To register for this event please visit the following URL: http://www.udyojakchurcha.com/marathi-entrepreneurs-club-registration/ →

 

Date And Time

-
 

Location

Online event

Share With Friends