‘शेर शिवराज’ चित्रपट

“शेर शिवराज “हा मराठी चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पहावा असे आवाहन.

      शिवरायांची नीती,आणि त्याला जोडून एक उद्योजक, व्यावसायिक म्हणून किंबहुना एक माणूस म्हणून आपल्या जगण्यात आमूलाग्र बदल करायचे असतील तर शिवरायांना काही अंशी जरी समजून घेतले तरी ते पुरेसे होईल आणि सध्या याचे सोपे माध्यम म्हणजे ऐतिहासिक चित्रपट. "शेर शिवराज" चित्रपटातून खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

ही पोस्ट आपल्या सहकारी व मित्र मंडळी सोबत शेअर करायला विसरू नका !

================
उद्योजक चर्चा (मराठी उद्योजक) फेसबुक ग्रुप परिवारामध्ये मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सहभागी होवु शकता*

https://www.facebook.com/groups/211096260128452/?ref=share

=================

       आजच्या जगात जर प्रत्येक घरात आई जिजाऊ जन्माला आल्या तर प्रत्येक घरात राजे जन्माला येण्यास कोणतीच अडचण नाही, आपण पालक या नात्याने आपल्या पाल्याला जे स्वप्न दाखवतो ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण किती प्रयत्नशील आहोत हे खूप महत्वाचे आहे त्या प्रयत्नांची गाठ संस्काराशी बांधली तर गुलामगिरीशी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यावाचून आपल्या पाल्याला कोणीही थांबवू शकणार नाही.                                         

    महाराजांवरील सर्वच चित्रपट आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक बंधू भगिनींनी पाहिला पाहिजे आणि आपल्या पाल्याना ते पहावयास लावून किमान इतिहासाची काही पाने त्यांच्या नजरेखालून घालवण्याचा सोपा मार्ग अवलंबला पाहिजे तो म्हणजे ऐतिहासिक चित्रपट.

    स्वराज्याची व्याख्या किती खोल होती याची जाणीव आपल्याला असायला हवी, आपण आपल्याच राज्यात नोकर  वाढवत आहोत,आज बाहेरच्या राज्यातून  महाराष्ट्रात येवून लाखो बांधवांनी स्वतःचे व्यवसाय उभे केले आणि त्यांच्याच कंपनीत आज आमची शिकलेली तरुण मुले सुरक्षा रक्षक,ऑफिस बॉय,क्लार्क,डाटा एंट्री,मॅनेजर, वेटर,सफाई कामगार अशी कामे करत आहेत कारण एकच आपण त्यांना उच्चशिक्षण तर दिले पण उद्योग व्यवसायाचे धडे कधीच दिले नाहीत या उलट इतर समाजांनी त्यांच्या मुलांना उच्चशिक्षणाबरोबरच नोकऱ्यापेक्षा  उद्योग व्यवसाय कसे फायदेशीर हे शिकवले म्हणून त्यांच्या पिढ्यानपिढ्या उद्योग व्यवसायात आहेत पण आपण मात्र आपल्या मुलांना हेच सांगत आलोय की 'आपल्या बापजाद्याने कधी व्यवसाय नाही केला'.
   आज राज्यात प्रत्येक क्षेत्रात 90% अधिक मोठ्या प्रमाणात आपण आपल्या सारख्याच सामान्य माणूस असलेल्या परप्रांतीयांना  "शेठजी" बनवले आहे आणि आमची तरुण पिढी त्यांच्या दुकानात कापड मारायचं काम करत आहेत.

 आपल्याच राज्यात व्यवसायाच्या अनेक संधी असूनही ही संधी दुसऱ्यांना देवून त्यांच्याकडे चाकरी करणारी तरुण पिढी हा त्या पिढीचाच दोष नाही तर वर्षानुवर्षे चालत आलेली शिक्षण आणि संस्कारपद्धती सुद्धा यासाठी जबाबदार आहे,

आपल्या पुढच्या पिढीने चाकरी करावी म्हणूनच महाराजानी स्वराज्य मिळवून दिले होते का ?? असा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.
“शेर शिवराज” या चित्रपटातून एक उद्योजक-व्यावसायिक म्हणून काय शिकायला मिळाले???

🎯♻️ व्यवसायात योजना हव्याच , या योजना आखत असताना प्लॅन A अपयशी झाला तर प्लॅन B,प्लॅन B अपयशी झाला च तर प्लॅन C ,आशा योजनांची तरतूद आपण आपल्या प्रकल्पाच्या प्रस्तावात ठेवली पाहिजेत.

🎯♻️ महाराजांकडे स्वराज्यासाठी जीव देणारे मावळे होते, तसेच आपल्या उद्योग व्यवसायातही असे मावळे आहेत का जे तुमच्या उद्योजक व्यवसाय वाढीसाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, आणि ते असे करतील यासाठी आपण त्यांच्यासाठी काय करतो याचा अभ्यास तुम्हाला आहे का???

🎯♻️ जसे आपला प्रतिस्पर्धी बलाढ्य असून त्याच्या भरपूर चांगल्या बाजू आहेत तसेच त्याच्या कमकुवत बाजुही असतात म्हणजेच गुण-दोष यांचा अभ्यास उद्योजक म्हणून आपण कधी करतो का??

🎯♻️ योजना आमलात आणत असताना धैर्य ठेवा,योग्य संधीची वाट बघा,नवीन संधीसाठी नेहमी तयार रहा.

🎯♻️ स्वतःचे ध्येय व्यापक ठेवा ,तुमचे मोठे ध्येय तुमच्या सहकाऱ्यांना नेहमी सांगत रहा,त्यांच्या नसानसांत तुमचे ध्येय उतरवा यामुळे तुमच्या सहकाऱ्याना ही तुमचे ध्येय स्वतःचे ध्येय वाटेल,तुमच्या ध्येयात तुमचे सहकारी सामील होतील आणि मग आपली संघटना आणि संघ दोन्ही उत्तम आणि मजबूत होतील.

🎯♻️ संघात माणसं जीव घेणारी नाही तर जीवाला जीव देणारी पाहिजे, संघटनेसाठी जीवापड प्रयत्न करणारी पाहिजे.

🎯♻️ संघटनेतील आपल्या सहकाऱ्यांचे (Team Members) चांगल्या कामाचे कौतुक चार चौघात करा, तर चुका या एकांतात नजरेस आणून द्या.

🎯♻️ नेतृत्व करत असताना कठीण आणि खडतर परिस्थितीमध्ये अमलबजावणीसाठी उद्योजकाने सर्वात आधी स्वतः पुढाकार घेवून आपल्या सहकाऱ्यां मध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे की हे काम आपण करू शकतो, आलेल्या आव्हानाला सामोरे जाऊ शकतो.

🎯♻️ आपल्या सहकाऱ्यांना चांगल्या कामगिरीसाठी नेहमी प्रोत्साहन देत राहा ,त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक करा.

🎯♻️ शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यांमधून किंबहुना रयतेतून त्यांच्या दूरदृष्टी च्या जोरावर वेगवेगळ्या कामगिरी साठी वेगवेगळे विशेषज्ञ (specialist) तर निवडलेच होते पण त्यांच्या विशिष्ट कलागुणांना वाव देऊन त्यावर जणू मातीचे रूपांतर मडक्यात केल्याप्रमाणे त्या लोकांवर काम करून स्वराज्यासाठी योग्य ठिकाणी योग्य वापरसुद्धा केला. आपण ही संकल्पना आपल्या उद्योग व्यवसायात हुभेहुब अंमलात आणू शकतो.

🎯♻️ एखादी मोठी कामगिरी हाती घेण्यापूर्वी आपल्या सहकाऱ्याना आपल्या संकल्पनेबद्दल माहिती द्या, कारण एखादा प्रकल्प यशस्वी होण्यामध्ये ‘टीम’ सर्वस्वी जबाबदार असते, आपल्या सहकऱ्यांची मते, सूचना, संकल्पना विचारात घेऊन योग्य तिथे त्या अंमलात आणा.
शिवरायांच्या या आणि अशा अनेक संकल्पना आपण आपल्या उद्योजक व्यावसायिक जीवनात वापरू शकतो, आमच्या बौद्धिक कुवतीनुसार जेवढे सुचले तेवढे आपल्या समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही ‘उद्योजक चर्चा’ या मंचाच्या माध्यमातून करत आहोत.

माध्यम- चित्रपट “शेर शिवराज”
संकल्पना-अनिल पाटील (संस्थापक – उद्योजक चर्चा)
लेखन- इंजिनिअर प्रविण पाटील

प्रसारक-
उद्योजक चर्चा
मराठी पाउल पडती पुढे🚩

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *