विद्यमान आणि प्रस्तावित मराठी उद्योजक बंधू भगिनींनो,
उद्योजक हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे असले तरी उद्योजकांसमोर अनेक आव्हाने आहेत..ज्याकडे प्रशासन इच्छा असुन देखील लक्ष्य देवू शकत नाही.राज्यात किंबहुना देशात काही समाजाच उद्योगधंद्यामध्ये मक्तेदारी प्रस्थापित करू शकले.याचे मुख्य आणि एकमेव कारण म्हणजे त्या समाजांनी आपल्या कम्युनिटीवर केलेले सामाजिक काम असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.
शैक्षणिक जीवनापासून आपल्या पाल्ल्यावर आपला मराठी समाज उत्तम नोकरी मिळवण्यासाठीचे संस्कार करत असतो.पण तुलनात्मकरीत्या पाहता महाराष्ट्रात बाहेरून येवून उदयोग व्यवसायात मक्तेदारी स्थापन करणाऱ्या ईतर समाजांनी आपल्या पाल्यावर जन्मापासून उद्योजक आणि व्यावसायिक बनण्याचे धडे व्यवहारिकदृष्ट्या दिले.आणि म्हणूनच हे समाज आज या स्तरावर आपली उद्योग व्यवसायावरील पकड मजबूत करू शकले.आज आपल्या समाजात सुध्दा उशीरा का होईना पण याची जाणीव झालीय हे दिसत आहे.
सर्वसामान्य मराठी उद्योजकांच्या आणि व्यावसायिकांच्या अनेक अडचणी लक्षात घेवुन आणि उद्योग व्यवसायाच्या प्रवाहातून संपुष्टात येत असलेला आपला समाज या गोष्टीचा विचार करून दिनांक १ जानेवारी २०२० या रोजी आपल्या समाजप्रतिची आपुलकीची भावना घेवुन ” उद्योजक चर्चा “ही संस्था स्थापन झाली .महाराष्ट्रात मराठी उद्योजक वाढले पाहिजेत,वाढलेले उद्योजक टिकले पाहिजेत आणि टिकलेल्या उद्योजकांना अनुकूल उद्योजकीय वातावरण मिळाले पाहिजे.हे या संस्थेचे उद्दिष्ट्ये आहे. हि संस्था अल्पावधीतच हजारो मराठी व्यावसायिकांना एकाच मंचावर घेवून येवून त्यांच्या समस्यांचे अविरतपणे निराकरण करण्याचे काम करत आहे.त्याच बरोबर आपला मराठी समाज उदयोग व व्यवसायिक म्हणून मुख्य प्रवाहात कसा येईल यावर सातत्याने प्रयत्न करत आहे.आपला समाज चांगली उद्दिष्ट्ये घेवून एकत्र आला तरच आपण एक विशिष्ट उंची नक्कीच गाठू असा आम्हाला ठाम विश्वास आहे
जय महाराष्ट्र !
आपली उद्योजक चर्चा टीम
आमची उद्दिष्ट्ये
मराठी समाजातील असंघटित उद्योजक व्यवसायिकांना एकत्र आणणे, बहुतांश मराठी तरुणांना व्यवसायाकडे वळवणे, मराठी उद्योजक वाढवणे, टिकवणे आणि टिकलेल्या उद्योजकांना अनुकूल वातावरण निमार्ण करून देणे.
आमचे ध्येय
महाराष्ट्रात किंबहुणा देशात आणि जगात मराठी उद्योजक वाढवून उद्योग व्यवसायापासून अलिप्त राहणाऱ्या मराठी समाजाला उद्योग जगतामध्ये मुख्य प्रवाहात आणून मराठी समाजाला आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक सक्षम करणे .
तमाम मराठी जनतेस,
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भारतातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. उद्योग आणि व्यवसाय हा या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परंतु महाराष्ट्रात उद्योगव्यवसायाच्या सर्वोच्च स्तरावर परप्रांतातून येऊन इतर समाजांनी मक्तेदारी स्थापन केलेली आहे आणि आपला मराठी समाज याच उद्योगव्यवसायांच्या दारोदारी रोजगार मागत फिरताना दिसतोय. मराठी समाजाने पिढ्यानपिढ्या उद्योग व्यवसायाकडे पाठ फिरवलेली आहे आणि याचे पडसाद खोलवर उमटल्यावर आपण जागे होत आहोत. खूप कमी प्रमाणात असलेला उद्योग व्यवसायातील मराठी समाज आपल्याला वाढवायचा आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही, सुरवात आपण आपल्या मूलाबाळांपासून करू, त्यांना उद्योग व्यवसायाचे बाळकडू शैक्षणिक जीवनातच देण्याचा प्रयत्न करू, त्यामुळे ते शिक्षण संपल्यावर नोकऱ्या शोधत बसणार नाहीत तर प्रत्येक मराठी तरुण व्यवसायाकडे वळेल आणि महाराष्ट्रात उद्योगव्यवसायात आपली मक्तेदारी प्रस्थापित करू शकेल यात शंका नाही.
चला तर मग मराठी तरुण उद्योगव्यवसायात आणून, वाढवून तो टिकविण्याच्या या चळवळीत सामील होऊया.

अनिल पाटील
संस्थापक उद्योजक चर्चा
आमची टीम

विकास इंगळे
उद्योजक

अर्चनाताई पाटील
उद्योजिका

इंजि. प्रविण पाटील
उद्योजक

संदीप गायकवाड
उद्योजक

प्रशांत सोनारे
उद्योजक

महेंद्र भोईर
उद्योजक

प्रियेश ढेकळे
उद्योजक

अशोक पाटील
उद्योजक

शकुंतला काळे
जेष्ठ उद्योजिका
आमचे मार्गदर्शक

विनोद मेस्त्री
लेखक | प्रशिक्षक | वक्ते | लाईफ - बिझनेस कोच

समाटे नारद
लाईफ बिझनेस कोच

ज्योतीराम सपकाळ
डिजिटल कोच

राहुल र मळगांवकर
डिजिटल कोच

दत्ता गायकवाड
हेल्थ कोच
का सामील व्हाल?
चांगले आर्थिक जीवन आणि सुंदर उद्योजकीय भविष्यासाठी आमच्यात सामील व्हा.
उद्योजक चर्चा सातत्याने मराठी उद्योजक व्यवसायिकांच्या व्यवसायिक जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणण्याकरिता कटिबध्द आहे.त्यासाठी मराठी उद्योजक व्यावसायिकांचे संघटन होणे अत्यावश्यक आहे ज्यामुळे संघटनात्मकरीत्या ध्येय गाठणे अधिक सोयीस्कर होईल