इतरांचं कायम ऐकत बसलात तर डबकं कसं सोडाल?

एकदा बेडकांना वाटलं की, आपण शर्यत लावावी.आपल्यात असं काय
कमी आहे की, आपण
या भल्यामोठय़ा टॉवरवर
चढू शकत नाही.
सतत काय डबक्यात
रहायचं. आपण चढू, उंचावरून जग पाहू! उंच जाऊ.

सगळे बेडूक ठरवतात
की शर्यत लावायची.

माणसांना, इतर प्राण्यांना
ही बातमी समजते.
तुफान गर्दी जमते.

लोक हसतात. पाली
चिडवतात. इतकंच
काय उंदीर, घुशी,
नाकतोडे, गांडूळंसुद्धा
म्हणतात की, डबकं
सोडून जाऊ नका,
तुमच्यानं काहीच होणार
नाही. उगंच पडाल,
फुकट मराल.

पण बेडूक काही ऐकत नाहीत.

स्पर्धा सुरू होते. इटुकले बेडूक उडय़ा मारत चालू लागतात. पण मागून
सतत कानावर आवाज.
‘अरे पडाल, अरे नाही जमणार, अरे कशाला.’

तरी बेडूक पुढं जातात, चालत राहतात.

टॉवरवर चढायला लागतात. कानावर आवाज येतातच. पडाल. पडाल.

एकेक करत बेडूक खाली पडायला लागतात.
रडतात. हरतात.

एक बेडूक मात्र सरसर चढत टॉवरवर चढतो.

वर जाऊन पाहतो.

ते विहंगम दृश्य पाहून
खूश होतो.

लोकं टाळ्या वाजवतात.
इतर प्राणीही अवाक्
होतात.

हे घडलं कसं?

तो बेडूक खाली उतरतो.

सगळे त्याला विचारतात,
तुला हे कसं जमलं?
इतका विरोध? इतकी
टवाळी?

तरी तू डबकं कसं काय सोडलंस?

तो बेडूक काहीच बोलत
नाही.

तेवढय़ात एक म्हातारा
बेडूक येतो. म्हणतो,
तो जन्मत:च कर्णबधिर
आहे. त्याला ऐकूच येत
नाही.

सगळे गप्प होतात..

त्यावर तो म्हातारा बेडूक
बाकीच्या बेडकांना म्हणतो, टॉवरवर चढण्याची आस
आणि डबकं सोडण्याची
इच्छा असणंच पुरेसं नाही. लोकं आपल्याला
चिडवतात, हरवतात,
नाउमेद करतात तेव्हा
चालत राहण्याचं बळ हवं.

इतरांचं कायम ऐकत बसलात तर डबकं कसं सोडाल?
यातून जमेल तर
काहीतरी शिका……….
प्रगती करताना
लोकांच्या म्हणन्याकडे
लक्ष देऊ नका…😊😊😊

संकल्पना – अनिल पाटील ,संस्थापक उद्योजक चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *