उद्योजक महाराष्ट्राचा

संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक उद्योजकांना एकत्र करून त्यांनी आपापल्या व्यवसायात केलेली प्रगती,व्यवसायाचे स्वरूप,त्यांचे ग्राहक आणि त्यांचे सदर व्यवसायातील यश यांचा आढावा चित्रीकरणाच्या माध्यमातून घेऊन त्या असंख्य सहभागी उदयोजक व्यावसायिकांमधून उत्तम असा ‘उद्योजक महाराष्ट्राचा’ निवडण्यात येईल आणि विजेत्यांना दिग्गजांच्या हातून आकर्षक पारितोषिके त्याचबरोबर सहभागी उद्योजकांना प्रमाणपत्र देवून गौरवण्यात येणार आहे.उद्योजक व्यवसायिकांची प्रशंसा करून त्यांना प्रेरणा देण्याकरीता त्यांचा गौरव करण्याचा हा एक अनोखा उपक्रम आहे.