‘हर हर महादेव’ चित्रपट

सन्माननीय उद्योजक बंधू भगिनींनो…..
‘हर हर महादेव’ चित्रपट पाहिला. आजकाल मराठी चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद पाहून बरे वाटते, त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांवरील चित्रपटांना अजून चांगला प्रतिसाद मिळत असतो.

एकूणच ‘हर हर महादेव’ या चित्रपटात घेण्यासारखं खूप असलं तरी आमच्या दृष्टीने इतकं घेतळ तरी पुरेसं आहे.
१) आपली कारकीर्द सुरू करण्यास विलंब करू नका, तारुण्य परत येत नाही, त्यातच पराक्रमी बना, जसे शिवरायांनी केले.
२) आपल्या उद्योग व्यवसायातील साथीदार (कर्मचारी) निवडताना ते नक्कीच बाजीप्रभू असले पाहिजेत, मग तुमची मोहीम फत्ते झालीच म्हणून समजा.
३) बाजीप्रभू जेंव्हा गोंधळलेले होते तेंव्हा त्यांची समजूत शिवरायांनी अशी काढली की त्यानंतर स्वराज्याच स्वप्न हे बाजीप्रभूंच स्वप्न झालं, त्याप्रमाणे तुम्हीसुद्धा तुमच्या ‘बाजीला’ सांगण्याचा आणि समजावण्याचा प्रयत्न करा, तुमच्या संस्थेचे स्वप्न हे संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाचे स्वप्न कसे होईल यावर काम करा.
४) सगळ्यात महत्वाचे किमान आतातरी जागे व्हा आणि अपापल्यातील भाऊबंदकी, छोटे मोठे वाद, कलह कसे मिटतील यासाठी प्रयत्न करा, जेणेकरून आपल्या स्वराज्यावर औद्योगिक, व्यावसायिक वर्चस्व असणारे परप्रांतीय उद्योजक महाराष्ट्रात याच गोष्टींचा फायदा घेत आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकले त्यांना आपण किमान यापुढे तरी रोकू शकू. यापुढे महाराष्ट्रात उद्योग व्यवसायात कोणीही जेधे, बांदल, देशमुख असणारच नाही असेल तो फक्त मराठी, मराठी आणि मराठी.

सर्वांनी हा चित्रपट जरूर पहा, सन्माननीय राज ठाकरे यांनी त्यांच्या बहारदार आवाजात या चित्रपटात केलेले कथाकथन तुमच्यात ऊर्जा भरून टाकते.

संकल्पना- अनिल पाटील, संस्थापक उद्योजक चर्चा.
लेखन- इंजि. प्रविण पाटील, उद्योजक

धन्यवाद,
आपली
टीम उद्योजक चर्चा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *