‘बिझनेस जत्रा’ मध्ये ‘उद्योजक चर्चा’

उद्योजक चर्चा
मराठी उद्योजकांच्या एकात्मिक विकासाची चळवळ

  प्रत्येकालाच आपला, आपल्या राज्याचा,आपली भाषा, आपल्या समाजाचा आणि आपल्या समाजातील लोकांचा गर्व,अभिमान असतो. आपली माणसं मोठी झाली तर सोबत समाज ही मोठा होतो ,समाज मोठा झाला की त्या समाजाचे राज्य आणि राज्य मोठे झाले की देश.
 देशाच्या GDP मध्ये आज एकट्या मुंबईचा वाटा जवळ जवळ 33% आहे परंतु एकूण   महाराष्ट्रातील उद्योजकांमध्ये आपले मराठी उद्योजक किती आहेत  हा आत्मचिंतानाचा  विषय आहे.

शैक्षणिक जीवनापासूनच आपल्या मुलांना आपण ‘बाळा चांगला अभ्यास कर तर चांगली लोकरी मिळेल’ ही भावना पूर्वीपासून रुजवत आलो आहोत ,यामधून काही प्रमाणात हुशार असणारी मुलं अभ्यास करून नोकरीही मिळवतात ,काही खूप हुशार अभ्यास करून डिग्री मिळवून ही बेरोजगार आहेत. अनावधानाने बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठी तरुणांना मिळेल त्या नोकरीवर आणि मिळेल त्या पगारावर समाधान मानावे लागते.असे करत करत मग वय होते लग्नाचे, आता हा एक मोठा सामाजिक प्रश्न आपल्या मराठी तरुण आणि त्यांच्या आईवडिलांना पडलेला आहे, नक्कीच अपेक्षा ही तशा वाढल्या आहेत आणि अपेक्षा असणे स्वाभाविक आहे.कसेबसे लग्न ही होते,मग लग्न,मुलं,जबाबदाऱ्या आणि पुढील प्रवास.

तात्पर्य येवढेच की पाल्य घडवायला पालकांचे योगदान खूप मोठे असते.लहानपणापासून पालकांकडून आपल्या मुलांना नोकरीसाठी चे प्रशिक्षण दिले जाते ,मग मुलं अभ्यास ही विशिष्ठ नोकरीचा करतात आणि मानसिकता ही नोकरी करण्याची ,परिणाम जे शहर राज्य देशाची आर्थिक राजधानी आहे तेथील समाज हा मोठ्या प्रमाणांत आज काय करत आहे तर नोकरी आणि रोजगारी.
मग प्रश्न हा पडतो देशाच्या अर्थव्यवस्थेत 33% GDP मध्ये योगदान असणारे आपले राज्य आणि या राज्यात आपण नाही तर मोठ्या प्रमाणात कोण आहेत हे उद्योजक जे पूर्वीपासून व्यवसाय करत आहेत,सोबत आपल्या समाजातील लोकांना ही इथे येवून व्यवसाय करण्यासाठी प्रेरित तर करत आहेतच शिवाय कामगार सुद्धा आपल्याच राज्यातून आणून त्यांना पुढे व्यवसायाचे धडे देऊन त्यांचा समाज व्यवसायात मोठा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. का त्यांनाच इथे संधी दिसत आहेत पण आपल्या मुलांना का दिसत नाहीत या संधी? या राज्यात यापुढे ही पिढ्यानपिढ्या असेच चालणार का ?

तर नक्कीच नाही, इथल्या मातीत मराठी म्हणून जन्माला आलेला प्रत्येक महाराष्ट्रीयन मराठी माणसाची यापुढे आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या पिढीसाठी व्यवसाय ज्ञान घ्यायचे आहे,व्यवसाया साठी आपल्या पाल्याला तयार करायचे आहे .याची जाणिव करुन देण्याची जबाबदारी आज आपल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे.

उद्योजक चर्चा या संस्थेची स्थापनाच यासाठी झाली आहे,आम्हाला असा ठाम विश्वास आहे की प्रत्येक तरुण या चळवळीत आमच्या सोबत येईल.

११ आणि १२ नोव्हेंबर २०२२ रोजी टीप टॉप प्लाझा ठाणे येथे लक्ष्यवेध आयोजित 'बिझनेस जत्रा' मध्ये 'उद्योजक चर्चा' या आमच्या संस्थेने आपला सहभाग नोंदवला होता.

आमच्या संस्थेने या बिझनेस जत्रेत आपल्या लोकांना उद्योजक चर्चेत सामील होण्याचेआवाहन केले.

 आम्हाला ठाम विश्वास आहे येणाऱ्या काळात उद्योजक चर्चा महाराष्ट्रात मराठी उद्योजक वाढीसाठी महत्वाचे योगदान देईल. देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेत मराठी उद्योजकाला आपले उच्चतम स्थान निर्माण करून देऊ शकेल.

जय महाराष्ट्र !
आपली
टीम उद्योजक चर्चा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *